वाळूजमहानगर, ता.29- तुला मूळबाळ होत नाही, तू वांझोटी आहेस. असे म्हणून बांधकामास माहेराकडुन 2 लाख रुपये आणण्यासाठी नेहमी शिवीगाळ करुन मारहाण व अपमानाने बोलून 27 वर्षीय विवाहितेचा शरिरीक, मानसीक छळ केला. याप्रकरणी सासरकडील आठ जणांविरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.27) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवालय चौक, बजाजनगर येथील प्रियंका दिलीप भगत (वय 27), या तरुणीचे लग्न
14 मे 2017 रोजी दिपक हरीभाऊ इंगोले (वय 35) रा पळसोना ता. जि. हिंगोली याच्यासोबत झाले. लग्नानंतर इंगोले परिवाराने प्रियांकाला 6 महीने व्यवस्थित नांदवले, परंतु त्यानंतर सासरकडील मंडळींनी घरातील कामावरुन तसेच तुला मुलबाळ होत नाही, तु वांझोटी आहेस. असे म्हणून तिला मारहाण करत तु भिकाऱ्याची आहेस, तुझ्या बापाने आम्हाला पाहीजे तसा हुडा, सोन्या-चांदीचे दागदागीणे दिले नाही. आम्हाला चांगला मानपान दिला नाही, आम्हाला तु पसंत नव्हती. असे म्हणुन वारंवार घालून पाडून बोलणे व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. तसेच घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये. तरच तुला नांदवू असे वारंवार बोलुन शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच 10 मार्च 2021 रोजी पती दीपक याने तुला तुझ्या आई-वडीलांच्या भेटीसाठी माहेरी शिवालय चौक, बजाजनगर येथे घेऊन जातो. असे म्हणून प्रियांकाला माहेरी आणून सोडले व निघुन गेला. तेव्हापासुन अद्यापपर्यंत त्याने तिला नांदवण्यासाठी घेवुन जाण्यास सतत टाळाटाळ केली.
याप्रकरणी प्रियांकाच्या फिर्यादीवरून बुधवारी (ता.27) रोजी आरोपी पती दिपक इंगोले, सासु-गंगाबाई इंगोले, भाया – शिवाजी इंगोले, जाऊ-मंगल इंगोले, नणंद संगिता सुभाष सुर्वे, नंदोई सुभाष सुर्वे व नणंद उज्वला मनोहर वानखेडे तसेच नंदोई मनोहर वानखेडे यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.