वाळूजमहानगर, ता.28 – जाऊबाईसोबत देवदर्शनासाठी 45 वर्षीय महिला गावातील कृष्ण मंदीर येथे गेली असता गावातीलच एका तरुणाने त्यांच्या मागेमागे येवुन विनाकारण वाईट हेतुने पाठलाग करुन जवळीकता साधुन मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. हा प्रकार बुधवारी (ता.27) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आंबेगाव येथे घडला.
याबाबत पीडित महिलेने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीचा असय असा की, 45 वर्षीय महिला व तिची जाऊबाई अशा दोघी 27 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास देवदर्शनासाठी गावातील कृष्ण मंदीर येथे गेल्या होत्या. दोघींनीही कृष्णाचे दर्शन घेवुन शेजारी लागुनच असलेले महानुभव पंथाचे दुसऱ्या मुर्तीचे दर्शन घेत असतांना तेथे गावातीलच आरोपी योगेश आंबादास साखळकर हा त्यांच्या मागेमागे येवुन विनाकारण वाईट हेतुन पाठलाग करुन विनयभंग केला. या प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी योगेश साखळकर रा. आंबेगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.