वाळूजमहानगर, ता.26 – सामाजिक विचार मंच तर्फे स्व. के व्हि हिंगणकर नाना नानी पार्क बजाजनगर परिसरात स्वच्छता व श्रमदान अभियान रविवारी (ता.24) रोजी राबविण्यात आले.
या वेळी काडी, कचरा उचलून साफसफाई करण्यात आली. या अभियानात सहभागी मंचचे रविंद्र शेलगावकर, अमर निकम, शिवाजी राऊत, विश्वनाथ धोंडगे, नंदकुमार कुलकर्णी, परमेश्वर गणाचार्य, अनिल सुपे, सावता अवघडे, सदाशिव पाटील, बालाजी पांचाळ, दत्ताभाऊ वाकडे, बटुगीर बावा, चंद्रशेखर दिवाकर, शेख शफी बाहोदीन, संजय फलटणे यांनी परिश्रम घेतले.