वाळूजमहानगर, ता.26 (बातमीदार) – राज्य क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सहजपुर येथील तनवाणी इंग्लिश स्कूल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत मोहित महेंद्र वाहूळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. तसेच जिम्नॅस्टिक खेळात कार्या अधिकारी आणि रुद्रानी मिठावाला यांची ही राज्य स्तरावर निवड झाली आहे व आकांक्षा मस्के हिने राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शाळेच्या संचालिका निशा तनवाणी, प्राचार्य प्रशांत आढागळे, प्रशासकीय अधिकारी समाधान कापरे, समन्वयीका गीता बिदे, नंदा घाडगे, क्रीडा शिक्षक अविनाश सुरेश पवार, कार्तिक व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.