वाळूजमहानगर, ता.25 – वाळुज औद्योगिक वसाहतीतील मायलन कंपनीच्या पार्किंग मध्ये हँडल लॉक करून ठेवलेली गवळीशिवरा येथील कामगाराची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना रविवारी (ता.24) रोजी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सागर पोपट म्हस्के रा. गवळीशिवरा हा कामगार 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता दुचाकी (एम एच 20, इ एम -9102) घेवुन नेहमी प्रमाणे वाळूज औद्योगिक वसाहतीतील मायलन कंपनीत गेला. त्याने कंपनीच्या बाहेरील पार्कीमगमध्ये दुचाकी हॅन्डल लाँक करुन उभी केली. व कंपनीत कामासाठी गेला. तो सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास कंपनीतुन काम करुन बाहेर आला व पार्कींगमध्ये लावलेल्या दुचाकीच्या ठिकाणी गेला असता तेथे दुचाकी दिसुन आली नाही. म्हणुन त्याने आजुबाजुच्या परिसरात व इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र ती मिळुन आली नाही. 25 हजार रुपये किमतीची हिरो होन्डा (शाईन) कंपनीची व ग्रे रंगाची ही दुचाकी हँन्डल लॉक तोडुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने स्वता:च्या फायद्यासाठी चोरुन नेली. याप्रकरणी पोपट तुकाराम म्हस्के (वय 49), रा. गवळीशिवरा, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.