February 23, 2025

वाळूजमहानगर, ता.16 – शेतकरी कष्टकरी राबराब राबून शेतमाल पिकवतो. परंतु नाकरत्या सरकारमुळे मालाला बाजार भाव नाही, योग्य बाजारपेठ मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळवून देणार तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध करणार व कापसाला पंधरा ते वीस हजार भाव मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार. असे आश्वासन डॉ. सुरेश सोनवणे यांनी गंगापूर येथे शनिवारी (ता.16) रोजी आयोजित विराट सभेत केले.

गंगापूर येथील राजीव गांधी चौकात अपक्ष उमेदवार डॉ. सुरेश सोनवणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष व तरुण उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सुरेश सोनवणे यांनी सभेला संबोधित करतांनी म्हणाले की, शिक्षकांना शिव्या देऊन शाळा सुधारत नसते, तर शाळा सुधारण्यासाठी विधानसभेत प्रश्न मांडावे लागतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, रोजगारावर न बोलणारे प्रशांत बंब फक्त बाहेरील जिल्ह्यातील रस्त्याचा भ्रष्टाचार काढून तेथील अधिकारी व आमदारांना ब्लॅकमेल करण्याचे काम करत राहिले. मी तुमचा भूमिपुत्र आहे. पंधरा वर्षे कोणी काय केले यापेक्षा मी पुढील पाच वर्षात पाच महत्त्वाची कामे या मतदारसंघात पूर्णपणे करून दाखवील. यात शाळा व शिक्षण सुधारणे, उद्योग व रोजगार वाढवणे, आयटी पार्क एमआयडीसीत आणणे, शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्ते, पाणी, वीज आणि शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे, सरकारी नोकरी व व्यवसायिक ट्रेनिंग सेंटर उभारणे. हा माझा मुख्य अजेंडा असून मी या प्रश्नांवर काम करेल. यावेळी डॉ सुरेश सोनवणे यांनी प्रस्थापितांवर जोरदार टीका करत यावेळी पाना या चिन्हाला विजयी करून मला पुढील पाच वर्षे आपली सेवा करण्याची संधी द्या.
असे आवाहनही केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *