February 23, 2025


वाळूजमहानगर, ता.16 – वाळूज ही औद्योगिकनगरी गंगापूर मतदारसंघात येते. याठिकाणी नामांकित कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये गंगापूर-खुलताबाद तालुक्यातील तरूणांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. असे आमदार. सतीश चव्हाण यांनी सांगितले.
गंगापूर-खुलताबाद विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी (ता.15) रोजी गंगापूर तालुक्यातील नायगाव -बकवालनगर, वाळूज, कमळापूर, जोगेश्वरी येथे भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर वाळुज येथे जाहीर सभा घेण्यात आली. या प्रसंगी बोलताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात औद्योगिक पर्यटन झोन म्हणून नव्याने मॉडेल करता आला असता. परंतु या मतदारसंघाचे नेतृत्व करीत असलेल्या लोकप्रतिनिधींना ते जमले नाही. वाळूज, रांजणगाव यासारख्या भागात विविध नामांकित कंपन्या आहेत. मात्र विद्यमान आमदार महोदयांनी किती स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला? यावर गत पंधरा वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून यांनी लक्ष का दिले नाही. याचा विचार करणे गरजेचा आहे. मोठा गाजावाजा करून वाळूज येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण करणार होते. या क्रीडांगणचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र हे क्रीडांगण अजूनही कागदावरच असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.
याप्रसंगी किरण पाटील डोणगावकर, मनोज जैस्वाल, लक्ष्मण सांगळे, अकुंश काळवणे, दिलीप बनकर, रावसाहेब तोगे, रमेश आरगडे, सुरेश वाघमारे, अनिल वाघ, प्रविण थोरात, पुष्पा जाधव, योगेश आरगडे, नासेर पटेल, सर्जेराव भोंड, नदीम शेख, नंदू सोनवणे, प्रा.राम बाहेती, लक्ष्मण पाठे, शंकर राठोड, नवनाथ वैद्य, विलास सौदागर, कृष्णा बोबडे, बबन काकडे, मनोज पिंपळे आदींची उपस्थिती होती.

भोपे पुजारी समाजाचा आमदार सतीश चव्हाण यांना जाहीर पाठींबा –
भोपे पुजारी समाजाने आमदार सतीश चव्हाण यांना जाहीर पाठींबा दिला आहे. मागील 15 वर्षांपासून गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे या मतदारसंघात यंदा परिवर्तन करणे गरजेचे आहे. यासाठी महानुभाव भोपे पुजारी समाज आमदार सतीश चव्हाण यांच्या पाठीशी असून त्यांना जाहीर पाठींबा देत असल्याचे भोपे पुजारी समाज विकास बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान उदरभरे, कृष्णराज दर्यापूरकर, भास्कर मल्ले, घनश्याम खाडे, केशवराव कारंजकर, यशवंत कपाटे यांनी म्हटले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *