
वाळूजमहानगर, ता.12 – गंगापूर खुतलाबाद मतदार संघात विकास दिसत नसून राजकारण्यांनी पैसा कमावण्यासाठी राजकारण केले. पैसाच कमवायचा आहे तर उद्योगपती बना राजकारणात वैचारिक आणि सामाजिक माणसांची गरज आहे. मी माझे गाव आदर्श करू शकतो तर तालुका आदर्श करण्यासाठी मी अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांना जाहीर पाठिंबा देतो. असे प्रतिपादन आदर्शगाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे यांनी केले.
गंगापूर खुलताबाद तालुक्यात बेरोजगारी वाढली आहे. पाणी, रस्ते, आरोग्य या मूलभूत सुखसुविधा झालेल्या नसून राजकारण्यांनी आतापर्यंत जनतेची दिशाभूल केली आहे. हीच योग्य वेळ आहे अपक्ष उमेदवार डॉ सुरेश सोनवणे यांचा पाना यावेळी चालेल व मतदार संघातील रखडलेल्या विकासाच्या चाव्या मोकळ्या होतील. याची मला खात्री असून मी मतदार संघातील माझ्या सर्व चाहत्यांना आवाहन करतो की, यावेळी बदल घडवणे अपेक्षित आहे. आणि तो बदल उच्चशिक्षित वैचारिक दूरदृष्टी असलेला व्यक्ती घडू शकतो. त्यामुळे जागृत होऊन योग्य व्यक्तीला पाठिंबा देणे गरजेचे आहे. राजकारण्यांनी पैशाच्या बळावर बोगस मतदान करण्याचे षडयंत्र चालू केले असून सुज्ञ नागरिकांनी याचा विरोध करून मतदानावेळी लक्षपूर्वक पाना चालवणे गरजेचे आहे. राजकारण हे पैसा कमावण्यासाठी नसून ते समाजाची सेवा करणे व समाजाला सुख सुविधा उपलब्ध करून देणे नागरिकांना असलेले प्रश्न सोडवणे त्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे यासाठी आहे. परंतु मागील काळामध्ये तालुक्यात राजकारण हे फक्त पैशाभोवती फिरत असून विकासाचे तीन तेरा झाले आहे. आमच्याकडे तालुका बदलण्यासाठी व्हिजन आहे समविचारी माणस आहेत आणि त्याच बळावर आम्ही पुढे जिंकून येऊ याची देखील मला खात्री असल्याचे आदर्शगाव सरपंच भास्करराव पेरे यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष काशिनाथ पाटील वेताळ हे देखील उपस्थित होते.
प्रतिक्रिया –
मी सत्याची लढाई लढतोय याचा मला अभिमान आहे. आदर्शगावचे सरपंच भास्करराव पेरे यांनी माझी साथ देणे ही मोठी गोष्ट आहे. त्यांची साथ आणि मार्गदर्शन मला मिळाले, व मायबाप जनता यांचे आशिर्वाद माझ्याकडे आहे. यामुळे विजय निश्चित असून आगामी काळात मतदार संघाला आदर्श मतदारसंघाकडे घेऊन जाण्यास वाटचाल करण्यास मी कटिबद्ध असेल. डॉ सुरेश सोनवणे अपक्ष उमेदवार.