वाळूजमहानगर, ता.5 – बजाजनगर येथे एका 29 वर्षीय तरुणाने भिंतीच्या खिळ्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
अनिल अशोक तरटे (29, रा. जातेगाव ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर हा बजाजनगर येथे किरायाने रूम घेऊन तो कंपनीमध्ये लोडींग-अनलोडींगचे काम करत असे. सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घर मालकाने अनिल यास आवाज दिला. मात्र घरातून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता अनिल हा घरातील भिंतीच्या खिळ्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दिपक कोळी, सुनील तरटे याच्या मदतीने अनिल यास बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी अनिल तरटे यास तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.