वाळूजमहानगर, ता.29- बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी येथे “शोधनिबंधांपासून ते अनुदान प्रस्तावांपर्यंत: वैज्ञानिक लेखन” या विषयावर आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन कार्यशाळा 25 ऑक्टोबर रोजी झाली.
ही पाच दिवसीय कार्यशाळा 21 ते 25 ऑक्टोबर दरम्यान श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (एपीटीआय) महाराष्ट्र राज्य आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (आयपीए), औरंगाबाद शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत संपूर्ण भारतभरातील 454 विद्यार्थी, संशोधन विद्वान आणि प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे उद्घाटन एपीटीआय (एमएस) राज्य अध्यक्ष डॉ. राकेश आर. सोमानी, आयपीए सचिव (औरंगाबाद शाखा) डॉ. संजय तोष्णीवाल, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरेचे कार्यकारिणी सदस्य संतोष डी. शेळके यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेने शैक्षणिक आणि संशोधन कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या भूमिकेवर भर दिला.
यावेळी या कार्यशाळेत फार्मसी क्षेत्रातील तज्ञ असलेले डॉ. जयप्रकाश एन. सांगशेट्टी, प्राध्यापक, वाय.बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी; डॉ. एल. सत्यनारायणन, प्राध्यापक व उपप्राचार्य, पूना कॉलेज ऑफ फार्मसी पुणे तसेच श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी येथील प्राध्यापक डॉ. प्रभाकर पानझाडे, डॉ. मनोज डमाळे, दीपक कुलकर्णी, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले छत्रपती संभाजीनगर विभागाचे अन्न व औषध प्रशासनाचे संयुक्त आयुक्त राजगोपाल बजाज यांनी नवोदित संशोधकांसाठी आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे कौतुक केले.
भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव ई.के. जाधव, सहसचिव अमन जाधव, प्राचार्य डॉ. संतोष डी. शेळके आणि प्रशासकीय अधिकारी बी.बी. जाधव यांनी आयोजक व सर्व प्राध्यापकांचे यशस्वी आयोजनाबद्दल स्वागत. केले.