कासोडा येथे तरुणाची आत्महत्या
वाळूजमहानगर – वाळूज परिसरातील कासोडा येथील 29 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी तारीख 22 रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली.
किरण गोरखनाथ कर्डीले (29) रा कासोडा ता. गंगापूर असे या तरुणाचे नाव आहे. त्याने रविवारी (ता.22) रोजी स्वताचे शेत गट नं 726 मध्ये असलेल्या लींबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. बेशुध्द अवस्थेत त्याला अतुल मछीद्र कर्डीले व नानासाहेब अशोक मनाळ यांनी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून 3.15 वाजता मयत घोषित केले. याप्रकरणी ए. आर. खिल्लारी यांनी घाटीतून दिलेल्या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार धनंजय राठोड करत आहे.