आर्टिफिशिअल इंटेलिजन्स डेटा सायन्स आणि ऑटोमेशन ही उद्योगासाठी यशाची त्रिसूत्री – अनंत कुलकर्णी
वाळूजमहानगर rknewslive

– आर्टिफिशिअल इंटेलिजन्स डेटा सायन्स ऑटोमेशन ही उद्योगासाठी यशाची त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया
(क्यूसीएफआय) च्या 22व्या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी संजीव ऑटो समूहाचे उपाध्यक्ष आनंत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्यूसीएफआय औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य नितीन किनगावकर होते.
क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया (क्यूसीएफआय) च्या 22 व्या संमेलनाचे उद्घाटन शनिवारी (ता.20) रोजी उत्साहात झाले. सांस्कृतिक बदलातून गुणवत्ता विकासाचे अंगीकरण या संकल्पनेवर या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हाच धागा धरून श्री कुलकर्णी यांनी गुणवत्ता विकास यावर सखोल मार्गदर्शन करताना औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी सर्व उद्योगांनी गुणवत्तेची कास धरली पाहिजे. तसेच गुणवत्ता विकासाचे धोरण अंगीकारत असताना नवीन अस्तित्वात आलेल्या संसाधनाचा वापर केला पाहिजे. यामध्ये डिजिटलायझेशन,डेटा सायन्स,ऑटोमेशन, रोबोटिक्स या सारख्या तंत्रज्ञानाचा समावेश होतो. तसेच त्यांनी भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले स्थान विशद करत प्लॅन चेक डु या संकल्पनांचा वापर करत वैयक्तिक विकासाबरोबरच उद्योगाच्या विकास साधावा. असे आवाहन स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना केले. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. वाळूज, बजाजनगर येथील साईघन
किड्स पार्कच्या ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या वापराचे वातावरणावर होणारे दुष्परिणाम तसेच प्लास्टिक बंदी या संकल्पनेवर सुंदर नाट्य रूपांतरण विद्यालयाच्या संचालिका ज्योती चीलात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले.
क्यूसीएफआय औरंगाबादचे अध्यक्ष नितीन किनगावकर यांनी संघटनेचा स्थापनेपासूनच्या झालेल्या संमेलनाचा आढावा घेत सांस्कृतिक बदलातून गुणवत्ता विकास ही संकल्पना विशद केली. क्यू सी एफ आय चे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्याचा सन्मानित यावर्षी औरंगाबाद विभागास प्रदान करण्यात आला आहे. याची घोषणा तसेच हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व उद्योगांनी सहकार्य करावे. असे आवाहन संयोजक डॉ. नरेंद्र जोशी यांनी केले. या संमेलनामध्ये औरंगाबाद, नाशिक,जालना विभागातून सुमारे 71 उद्योग समूहातून 105 संघाने सहभाग नोंदवला. प्रत्येक संघात सहा सदस्यांचा समावेश आहे.
स्पर्धेमध्ये एकूण सहा विभाग केले आहेत, यामध्ये कयझेन,पोकयोके एस एम ए डी,फाइव्ह एस, सेफ्टी हेल्थ अँड इन्व्हरमेंट यांचा समावेश आहे.
या स्पर्धेमध्ये सगळ्या उद्योग समूहाचे संघ आपापल्या उद्योगातील राबवलेल्या संकल्पना, बेस्ट प्रॅक्टीसेस व त्याद्वारे झालेला फायदा या विषयी सादरीकरण करणार आहेत. या स्पर्धेमध्ये विजयी ठरणाऱ्या सुमारे 52 संघांना औरंगाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेचा समारोप बजाज ऑटो लिमिटेडचे प्लांट हेड बाबासाहेब वालतुरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्यू सी एफ आय औरंगाबाद चे उपाध्यक्ष मंगलदास चोरगे यांनी केले तर आभार महेंद्र वानखेडे यांनी मानले. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी नितीन किनगावकर,डॉ नरेंद्र जोशी, मंगलदास चोरगे,अमोल गिरमे,सुधीर पाटील,संजय वैद्य,महेंद्र वानखेडे,राहुल देशपांडे,राजेंद्र पवार,डॉ. अस्मिता जोशी,अश्विनी देऊळकर,संदीप असावा, सरिता पारधी, विनिता पांडा,विजय अडलक,शेख ख्वाजा,सुदर्शन धारूरकर आदींनी परिश्रम घेतले.