वाळूजमहानगर, ता.24) – रांजणगाव (शे.पु.) ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर येथील शहीद भगतसिंह उच्च माध्यमिक विद्यालयाने मार्च 2024 मध्ये झालेल्या 12 वी परीक्षेत निकालाची परंपरा कायम राखत कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखेत घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये विज्ञान शाखा रोहन संतोष साखरे – 87.17, पूजा दिपक मोंढे – 82.33, स्नेहल प्रकाश जोहरे – 82.33. वाणिज्य शाखा आरती गोरक्ष चौधर – 90.33, दीक्षा दीपक त्रिभुवन – 88.50, आरती आनंद कल्याणकर -81.33. कला शाखा भारती रत्नाकर मुरदारे – 78.50, शालिनी युवराज जाधव – 76.50, पायल प्रशांत क्षीरसागर – 72.83 यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थापक नानासाहेब हरकळ, संस्थाध्यक्षा भारती साळुंके, संस्था सचिव हर्षित हरकळ, अक्षय हरकळ, प्राचार्या मनीषा सोनवणे, तसेच सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांनी स्वागत केले.