वाळूजमहानगर, ता.24) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे बारावीत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
विज्ञान शाखेमध्ये विशेषत: उपलब्ध झालेल्या क्रॉप सायन्स विषयाची भर पडून विद्यार्थ्यांनी 12 वी बोर्ड परीक्षेत क्रॉप सायन्स विषयात प्रथम तीन विद्यार्थ्यांनी 200 पैकी 200 गुण प्राप्त केले.
विज्ञान ( क्रॉप सायन्स) शाखेतून निलंगे रिया 200/200) 90.33 गुण मिळवून रांजणगाव (शे.पुं.) परिसरातून प्रथम क्रमांक मिळवला. चौधरी गायत्री 200/200) 87.17 द्वितीय तर वानखेडे भक्ती (200/200) 85.50 तृतीय आली. तसेच
वाणिज्य (अकाउंट)
शाखेत प्रथम- जाधव सुहानी 97/100) 85.33,
द्वितीय- सोमवते स्नेहा (97/100) 79.83, तर गायके माया (98/100) 76.17 तृतीय क्रमांक मिळवला.त्याचबरोबर
कला शाखेत प्रथम- शेख आयेशा 68.00, द्वितीय- पवार अंकिता 64.50 तर मोरे सोनू 63.67 तृतीय आला.
दरवर्षीप्रमाणे विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचा 100 टक्के उज्वल यशाची परंपरा कायम राखली. त्याप्रती विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव, सचिव हरिश जाधव, मुख्याध्यापक सुरेखा बस्वदे, एम व्ही शिनगारे, एच बी जाधव, पुजा गिरी, बी. व्ही शिरसाट, आर एस बिदरकर, संभाजी जाधव, उल्हास वाघ, सौरभ लगड, सुनील शिंदे, विनय अवसरमोल उपस्थित होते.