February 24, 2025

वाळूजमहानगर, (ता.23) – वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे किरायाच्या घरात राहणाऱ्या एका 29 वर्षीय विवाहीत महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना गुरुवारी (ता.23) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मात्र तिचा खून केला की, तिने आत्महत्या केली. या संभ्रमात पोलीस सापडले आहेत.

वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) च्या एकतानगर येथील कृष्णानगर येथे गुरुवारी (ता.23) रोजी सकाळी 7 वाजता ज्योती सुभाष राऊत 29 ही विवाहित महिला बेशुद्ध अवस्थेत घरात पडलेली आढळून आली. ही माहिती नागरिकांकडून रूम मालक नसिर शेख यांना तसेच पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान हरिदास उत्तम उबाळे व घर मालक नसिर शिकंदर शेख यांनी तिला उपचारार्थ घाटी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले याप्रकरणी घाटी मेडिकल चौकीतून पोलीस हवालदार एस आर गवळी यांनी दिलेल्या माहितीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पती फरार –
ज्योती राऊत ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. ही माहिती मिळताच नागरिकांनी घरात व इतरत्र पाहणी केली. मात्र तिचा पती घरातून बेपत्ता होता. तो कामाला गेल्यानंतर हा प्रकार घडला की. प्रकार घडल्यानंतर गेला. हे तो आल्यानंतरच उघड होणार
आहे.

गळ्यावर आवडल्याचे निशाण –
बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या ज्योती राऊत हिच्या गळ्यावर आवळल्याचे निशाण आहे. मात्र तिने गळफास घेतला की, तीचा कोणी गळा आवडला. याचा उलगडा होत नसल्याने पोलीस द्विधा मनस्थितीत व संभ्रमात सापडले आहेत. ज्योती राऊत हिने आत्महत्या केली की, तिचा कोणी खून केला. हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात
असले तरी डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर त्याचे बिंग फुटणार आहे. हे मात्र निश्चित.
गल्लीत नवीनच आले होते –
म्हाडा कॉलनी, भोकरदन ता. भोकरदन जि. जालना येथील ज्योती सुभाष राऊत वय 29 वर्ष
ही विवाहिता नुकतीच रांजणगाव (शेणपुंजी) येथे नासेर शिकंदर शेख यांच्या रूममध्ये किरायाने राहावयास आली होती. त्यामुळे त्यांना गल्लीतील व परिसरातील नागरिक पुरेसे ओळखत नव्हते.
गल्ली व परिसरात खळबळ
वाळूज औद्योगिक परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लूटमार, हाणामाऱ्यासह प्रमाणातही मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. यामुळे वाळूज औद्योगिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *