वाळूजमहानगर, (ता.22) – संसाराचा डाव अर्ध्यावर मोडून बजाजनगर, जोगेश्वरी, तीसगाव, विटावा येथून मे महिन्यात वेगवेगळ्या दिवशी चार महिला व दोन पुरूष असे 6 जण बेपत्ता झाले. वाळूज परिसरातील बेपत्ता होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भारती योगेश सुरासे (25) रा. जोगेश्वरी ही विवाहिता 9 मे रोजी राहत्या घरातून ब्लाऊज टाकून येते म्हणून घरातून निघून गेली. ती अद्यापही घरी परतली नाही. तिचा आजूबाजूला इतत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
दुसऱ्या घटनेत प्रतिक्षा भानुदास सरोदे (28) रा. खवड्या डोंगर तिसगाव ही विवाहिता 13 मे रोजी किरकोळ वाद झाल्याने राहत्या घरातून निघून गेली. तीचा नातेवाईकाकडे शोध घेतला असता अद्यापही मिळून आली नाही.
तिसऱ्या घटनेत अल्का संजय भुंजग (38) रा. खवड्या डोंगर तिसगाव ही विवाहिता 18 मे रोजी बॅकेतून पैसे काढून येते. असे म्हणून घरातून निघूून गेली. ती अद्यापही घरी परतली नाही परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. चौथ्या घटनेत पायल संदिप चंडयिला (21) रा. बजाजनगर ही 21 में रोजी राहत्या घरातून कोणाला काही न सांगता निघून गेली. तीचा नातेवाईक आणि इतत्र शोध घेतला असता मिळून आली नाही.
पाचव्या घटनेत लखन भगवान मुदीराज (35) रा. विटावा हा 2 में रोजी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेला. त्याचा शोध घेतला असता तो आजपर्यंत घरी आला नाही. साहव्या घटनेत संदिप शिवाजी डोळे (35) रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर हा 14 में रोजी बॅकेत खाते उघडून येतो. असून म्हणून घरातून निघून गेला. तो घरी न आल्याने त्याचा परिसरात शोध घेतला.मात्र तो मिळून आला नाही.
या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाले म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मपोह रेखा चांदे करीत आहे.