वाळूजमहानगर, (ता.21) – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिडको वाळूज महानगर -1 येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन गुरुवारी (ता.23) रोजी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले आहे.
याप्रसंगी शिवव्याख्याते शिवश्री रवी गवारे यांचे व्याख्यान देखील होणार आहे. या कार्यक्रमा मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील हे पहिल्यांदाच वाळुज महानगरात येत आहे. सिडको वाळूज महानगर-1, येथील पाण्याची टाकी मैदान येथे होणाऱ्या जाहीर सभेला परिसरातील व जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवभक्तांनी व मराठा बांधवांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहावे. असे आवाहन सकल मराठा समाज वाळुज महानगर 1 छत्रपती संभाजीनगर व आयोजन समिती समन्वयक बाळासाहेब पाथ्रीकर, सुभाष औताडे, संजय आळंजकर, परमेश्वर नलावडे, प्रा. कैलास जाधव, आत्माराम आगलावे, विलास पांगरकर, जनार्दन निकम, प्रल्हाद सूर्यवंशी, संतोष बारगळ, संतोष कुंटे, रामेश्वर चौधरी, बप्पा चौधरी, लक्ष्मण कोरडे, राजू वंजारी, दिनकर पवार, अवचितराव मोरे, शिवराज मिटकरी, राम शिंदे, अमर तरटे, पिंटू घाइट यांनी केले आहे.