वाळूजमहानगर, (ता.18) – घरासमोर लावलेली तीस हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरटय़ांनी चोरून नेली. शनिवारी 4 मे रोजी ही चोरीची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शनिवारी ता 18 रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सागर सुरज रासकर वय 32 वर्ष, रा. जनकल्यान फळभाजी मार्केट. देवगिरी सुपर शॉपी समोर बजाजनगर ता.जि. छत्रपती संभाजीनगर
यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, माझ्या मालकीची काळ्या निळ्या रंगाची स्पेलंडर प्लस (एम एच 16, एके -2637) ही तीस हजार रुपये किमतीची दुचाकी शुक्रवारी 3 मे रोजी रात्री 9 वाजता सुमारास घरासमोर लावली. ती अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून लंपास केली. शनिवारी 4 रोजी सकाळ लंपास केल्याचे उघडकीस आली. या दुचाकीचा परिसरात शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.18) रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे