February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.28) – बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवानी विद्यालयात प्रजासत्ताक दिना निमित्त विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून देशभक्ती पर, पर्यावरण पूरक घोषणा दिल्या. यावेळी प्रतिमा पूजन करून आयकर विभागाचे सहआयुक्त विजय नेटके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विजय उखळे होते. यावेळी प्रमुख पाहुणे आयकर विभाग सहआयुक्त विजय नेटके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अडव्होकेट भगवान निंबाळकर, संस्थेचे हनुमान भोंडवे, अशोक लगड, राजेंद्र माने, पंडीत नवले, मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, राजश्री कदम, विशाल लगड, सागर माने, स्वप्निल नवले, स्वप्निल उखळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत, झांज प्रात्यक्षिक, रिंग कवायत, झालर कवायत शारीरिक कसरतींचे, लेझिमचे प्रात्यक्षिक, मनोरे, देशभक्तीपर गीते तसेच समूह नृत्य केले.
विद्यार्थ्यांनी कवायती द्वारे भारताचा 75 हा अंकाचे प्रात्यक्षिक सादर केले. पालकांनी प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *