
वाळूजमहानगर, (ता.27) – आदर्श ग्राम पाटोदा येथील प्रसन्न शिक्षण संस्था संचालित सह्याद्री स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे संचालक प्रभाकर म्हस्के, अध्यक्षा निर्मला म्हस्के, शाळेचे मुख्याध्यापक निलेश म्हस्के व श्रद्धा म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालक प्रभाकर म्हस्के यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 
याप्रसंगी विद्यार्थ्यांची कवायत घेण्यात आली. मुख्याध्यापकांच्या हस्ते झेंडा फडकावून झेंडावंदन करण्यात आले. व सामूहिक राष्ट्रगीत गाण्यात आले. यानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषण, गायन, कविता करण्यात आल्या. प्री-स्कूल ते दुसरीचे विद्यार्थी स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेत आले आणि ते सर्वांसाठी लक्षवेधक ठरले. तसेच या दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक व प्रमाणपत्र उपस्थिताच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले. शेवटी खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती यादव, सुप्रिया गणगे, ज्योत्स्ना पाटील, ज्योती साळवे, मोनिका निर्मले, रत्नप्रभा पाटील, पूनम पाठक, शिल्पा पोफळी,प्रियंका गायकवाड, देबारती घोष, अभिषेक गौंड, कविता भराडे, आरती खंडागळे, रुचिका मेहेत्रे, कविता शर्मा, जया पगारे,परमेश्वर तवार, भाग्यश्री माचवे, माधवी कुलकर्णी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
