
वाळूज महानगर, ता.8 बातमीदार) – बजाजनगर येथील रामलीला मैदानावर उत्तर भारतीय हिंदी सांस्कृतिक मंच तर्फे दरवर्षी श्री कृष्ण जनमाष्टमीचे नियोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून बजाजनगर येथील सर्व उत्तर भारतीय समितीकडून हा आयोजित गुरुवारी (ता.7) रोजी करण्यात आला होता. 
यावेळी उत्तर भारतीय गायक कृष्णा चौबे व त्यांच्या टीमने राधे राधे बोलो आयेंगे बिहारी हे गाने गाऊन कार्यक्रमाची सुरवात केली. त्यानंतर रात्री 12 वाजता भगवान श्री कृष्णाचा जन्म उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्तित महिला मंडळाने पारंपरिक रीतीने व सोहर गायन करुन भगवान श्री कृष्णाच्या जन्माचे स्वागत करत श्री कृष्णाची आरती करण्यात आली. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोराडिया, उत्तर भारतीय हिंदी संस्कृतिक समितीचे राजेश सिंह, उद्योजक नरेंद्रसिंग यादव, आर पी सिंह, रामजन्मसिंह, जयप्रकाश सिंह, अकवाल बहादुर सिंह, कैलाश यादव, संतोष सिंह, सुनील सिंह, राधेश्याम शर्मा, हेमन्त श्रीवास्तव, जयप्रकाश सिंह, अरविंदसिंह कुंदन, त्रिपाठी, उपेंद्र श्रीवास्तव आदींची उपस्थिती होती.
