March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.17) – अवैध दारू विक्री करणार्याची माहिती दिल्याच्या संशयावरून हॉटेल मालकासह तेथे काम करणाऱ्या सात ते आठ जणांनी शेजारच्या हॉटेलवर काम करणाऱ्या आचार्यास बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. 8 मार्च रोजी घडलेल्या या घटने प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.16) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विनोद अंभोरे रा. वझर आघाव, ता. लोणार, जि. बुलडाणा हा वाळुज औद्योगिक परिसरातील कामगार चौक येथील प्रशांत बियरबार, येथे 14 पासून कामास आहे. प्रशांत बियरबारचे बाजुला युपी ढाबा असून त्याचा मालक अंकुश चक आहे. अंभोरे याचा मित्र ज्ञानेश्वर गावंडे रा. फुलंब्री याने अंकुश चक याच्या युपी ढाबा येथे कामावर असलेल्या एका मुलाला 4 हजार रुपये उसने दिले होते. परंतु त्याने पैसे परत केले नाही. म्हणून अंभोरे हा अंकुश चक याला पैशाबद्दल बोलला होता. त्यावेळी त्याने शिवीगाळ केली होती. तेव्हापासून अंभोरे व यूपी ढाब्याचा मालक अंकुश शेठ यांच्या बेपनाव निर्माण झाला. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी अंभोरे व मावस काका दिपक खरात असे अंभोरेच्या पानटपरीवर असताना, काही लोक दारू पिवून टपरी समोर धिंगाणा घालत होते. म्हणून त्यांना जाण्यास सांगीतले असता, त्यांनी अंभोरेला लाथाबुक्याने मारहाण केली. काकांनी समजूत काढल्याने पोलिसात तक्रार केली नाही. त्यानंतर होळीचे दिवशी अंभोरे हा हॉटेलजवळ असताना त्याला मारहाण करणारे लोक तेथे दिसले. ते पुन्हा मारतील म्हणून 100 नंबरवर कॉल केला होता. त्यावरून तेथे दोन पोलीस आले होते. बुधवारी (ता.8) रोजी रात्री 11.30 वजेच्या सुमारास अंभोरे हा प्रशांत हॉटेल मध्ये झोपलेला असताना, अंकुश चक व जमील तसेच त्याचे सोबत अंकुश चक याचे हॉटेल मध्ये काम करणारे ईतर सात ते आठ जण (नाव माहीती नाही) तेथे आले. अंकुश चक याने अंभोरेला उठवले व म्हटला की, मी दारु विक्री करतो म्हणून तु होळीच्या दिवशी पोलीस बोलावले होते ना. असे म्हणून त्याचे हातातील प्लास्टीकचे दांड्याने पायावर, पाठीवर, हातावर व हाताचापटाने व लाथाबुक्याने मारहाण करून जखमी केले. व तु येथून निघून जा. नाहीतर तुला जिवानिशी मारेल अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अंभोरेच्या फिर्यादीवरून गुरुवारी (ता.16) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *