
वाळूजमहानगर, (ता.26) – छत्रपती संभाजीनगर येथे 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेत बजाजनगर येथील शिवछत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पारितोषिके पटकावत घवघवीत यश संपादन केले.

संस्कृती मंत्रालय, भारत सरकारच्या अखत्यारीतील ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, औरंगाबाद मंडळाच्या वतीने आयोजित “विश्व धरोहर सप्ताह ” (World Heritage Week) च्या अनुषंगाने ‘ चित्रकला ‘ ‘निबंध लेखन ‘ आणि ‘वकृत्व स्पर्धाचे,’ आयोजन करण्यात आल्या होत्या. बीवी का मकबरा छत्रपती संभाजीनगर येथे 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धांमध्ये बजाजनगर येथील शिव छत्रपती विद्यालयातील विद्यार्थी व छत्रपती संभाजीनगर मधील विविध शाळेतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांमध्ये सर्वात जास्त पारितोषिक शिवछत्रपती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पटकावले.

स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महेश वाघ निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक, रोहित इंगळे निबंध स्पर्धेत 5 वा क्रमांक, गोपाल कावरखे चित्रकला स्पर्धेत 4 था क्रमांक घेतला.
सर्व विजयी स्पर्धकांना विभागीय आयुक्त लाकरा,
पुरातत्व विभागाचे अधिक्षक शिवकुमार भगत आदिंच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल शिवछत्रपती विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले व शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्याचे स्वागत करत कौतुक केले.
