February 5, 2026

वाळूज महानगर, (वा 24) – हॉटेल समोर उभी केलेली हुंदाई कंपनीची वर्णा कार अवघ्या तीनच मिनिटात पेटली. मात्र अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना शुकवारी 24 ऑक्टोबर रोजी दुपारी अत्यंत गजबजलेल्या बजाजनगरात घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात सुनील दिगंबरराव देशमुख यांची श्री मल्हार हॉटेल आहे.

शुकवारी 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास देशमुख यांनी हॉटेल समोर त्यांची हुंडाई वर्णा कार (एम एच 20, बी वाय- 1774) उभी करून हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर अवघ्या तीनच मिनिटात या कारने पेट घेतला. संभाजी चौधरी यांच्या हा प्रकार लक्षात आला. आशिष सात्रा यांनी अग्निरोधकाच्या मदतीने आग शमविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच प्रमुख अग्निशमन विमोचक एस जी वासनिक, आर के जाट, पी एस खाडे, एस टी मुळे, व्ही एस दाभाडे, पी आर नागरगोजे, पी के राठोड, डी पी पाटील, डी एस काळे आदींनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत कारचे अंदाजे 3 ते 4 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सुनील देशमुख यांनी सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *