March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.26) – अज्ञात चोरट्यांनी सिडको वाळूज महानगर -1 येथे नव्याने बांधलेल्या बंद घराच्या दरावाजाचे कूलूप तोडून, लाईट फिटींगसाठी आणलेले 60 हजार रुपये किमतीचे केबल वायर लंपास केले. या चोरी प्रकरणी सोमवारी (ता. 24) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.


याबाबत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीचा आशय असा, हरिदास पल्हाळ रा. सारा र्ई लाईट सिडको वाळूज महानगर -1 येथे राहतात. त्यांच्या नवीन घराचे बांधकाम सिडको वाळूज महानगर -1 येथील राजमाता जिजाऊ चौक येथे झाले असून लाईट फिटिंग सुरू आहे. काम सुरू असलेल्या घरातील कामगार घरी निघून गेल्यानंतर अज्ञात आरोपींना त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत ठेवलेले 60 हजार रुपये किमतीचे केबल वायर लंपास केले. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही चोरीची घटना उघडकीस आली. प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *