वाळुज महानगर, (ता.23) – संभाजीनगर- अहिल्यानगर महामार्गावरील नेहमी होणाऱ्या अपघात ग्रस्त जखमींना उपचारार्थ मदत करण्यासाठी पुढे धावून येणाऱ्या दहेगाव (बंगला) येथील गणेश राऊत यांना 12 जानेवारी 2025 रोजी शिवशंभु राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन तसेच शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथे 12 जानेवारी 2025 रोजी वीर शिवशंभो संस्थेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. छत्रपती संभाजी नगर -अहिल्यानगर तसेच जिल्ह्यावर महामार्गावर अपघाताचे मोठे प्रमाण वाढले असून महामार्गावर कुठेही अपघात झाल्यास त्यांच्या मदतीसाठी गणेश राऊत हे 24 तास सतर्क राहून त्यांच्या मदतीसाठी धावून जातात. गणेश राऊत यांनी आतापर्यंत 30 हून अधिक अपघात ग्रस्ताना जीवनदान दिले आहे.
राऊत यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन
वीर शिवशंभो संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. याआधी सुद्धा गणेश राऊत यांना विविध ठिकाणी विविध संस्थांमार्फत विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. राऊत यांच्या या सामाजिक कार्याचे परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.