March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.5)- दीड वर्षीय चिमुकला मुलगा व पतीसह वाळूज परिसरात राहत असलेली परप्रांतीय 21 वर्षीय महिला पती कामाला गेल्यानंतर चिमुकल्याला घरी सोडून कोणास काही एक न सांगता निघून गेली. ही घटना 10 एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली.

याबाबत राजेश अमरसिंग चौहान वय 25 वर्ष रा. अमरसिंह मुंडीया पोस्ट, चिरिया तहसिल झिरन्या, मुंडिया, खरगोन, मध्यप्रदेश (ह.मु. सी.एस.एम.एस.एस हॉस्पीटलजवळ, टोलनाका, लिंबेजळगाव, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी खबर दिली की, त्यांची पत्नी बीनु राजेश चौहान वय- 21 वर्ष व मुलगा चंदन वय-1 1/2 वर्ष असे राहावयास आहे. तसेच राजेश चौव्हान हे ठेकेदार लक्ष्मण उघडे रा.एन-7 सिडको,छ.संभाजीनगर यांच्याकडे सुमारे एक महिन्यापासुन मजुरी काम करतात.
10 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान चौहान कामावर असतांना घरी पत्नी व मुलगा होता. त्यांच्या बाजुला राहणारी मुलगी रोशनी हिने फोन करुन सांगीतले की, लहान मुलगा घरात एकटाच सोडून काड्या आणण्यासाठी बीनु एकटी बाहेरी गेली आहे. अजुन घरी आली नाही. असे सांगीतले. त्यामुळे तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ते मिळून आली नाही. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजे सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दशरथ खोसरे करीत आहे.
तिचे वर्णन असे-
संपुर्ण नाव – बीन राजेश चौहान वय 21 वर्ष, उंची 5 फुट, रंग गोरा, चेहरा लांबट, अगांत पंजाबी ड्रेस जांबळ्या रंगाचा, शरीराने सडपातळ, पायात लाल रंगाची चप्पल, भाषा पल भाषा, हिंदी, आदीवासी, बोलते. डाव्या हातावर अंगठ्या जवळ इंग्रजीत BR असे गोंदलेले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *