
वाळूजमहानगर, (ता.3) – वाळूज औद्योगिक वसाहतीत नव्याने स्थापन झालेल्या मोटर चालक, मालक वाहतूक संघटनेच्या वतीने पंढरपूर येथे कामगार पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत प्रथमच कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मोटार चालक, मालक कामगार वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोकुळ तुपे, जिल्हा सचिव मुकेश मंगरुळे, जिल्हा साहसचिव रामेश्वर चौधरी, पिंटू घाईट, अविनाश वाठोरे, मनीष परमार, गणेश अंबाडे, भीमराव दहिफळे, मनोज गर्जे, युवराज मोगल, अमोल ताठे, प्रकाश मोहिते तुषार कुंठे, जयसिंग वर्मा, मुकेश शेरावत यांच्यासह कामगार ड्रायव्हर व ट्रान्सपोर्ट मालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
