March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.14) – घाणेगाव येथील सरस्वती इंग्लिश स्कूल व सरस्वती विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच केशव गायके, सरस्वतीबाई कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालक प्रतिनिधी माजी ग्रामपंचायत सदस्य विजय शुक्ला, संतोष गायकवाड, पोलीस पाटील शाम फाळके, माजी सरपंच शामराव बनसोडे, दुर्गा उत्तमप्रसाद दुबे, सुधाकर जवळकर, जगन्नाथ गायके, माधव कानिटकर आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या, बेटी बचाव बेटी पढाव, कोरोना थीम, प्लास्टिक बंदी तसेच महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक परंपरा, नृत्य, कला तसेच आधुनिक काळातील नृत्यकला यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष केशव कानिटकर तसेच सुरेश वाकचौरे, कल्पना देशपांडे, अलका जवळकर, सचिन जवळकर, संजय काळे, निलेश भारती, डीपी वाघ आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री बोराडे आणि पूजा देशमुख यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वस्वी स्वाती बजाड, अनुराधा मुंडेकर, अर्चना चव्हाण, पूनम मुनाळे, पूजा टाकसांडे, बरखा भोपे, रवी राजगुरू, सचिन शेळके आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *