वाळूज महानगर, (ता.23) – कंपनी समोर सुरू असलेले पती-पत्नीचे भांडण सोडवण्यास केलेल्या एका तरुणावर ऍसिड हल्ला झाल्याने तो गंभीरजरीत्या जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता.21) रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीत घडली.
याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रेम साबळे हा आई, वडील, भाऊ कृष्णा यांच्यासह राहतो. वाळूज औद्योगिक वसाहतीतील एम सेक्टरच्या जोगेश्वरी येथील सेंट बनवणारी रुबीकॉन फार्मुलंस कंपनीमध्ये सहा महिण्यापासुन काम करतो. त्याच्यासोबत कंपनित काम करणा-या सुनिता निळ यांना तो ओळखतो. तो शनिवारी (ता.21) रोजी सायंकाळी जनरल शिफ्टसाठी कंपनीत काम करण्यासाठी गेला होता. संध्याकाळी 5.30 वाजता संपल्यानंतर अंदाजे 5.40 वाजेचे सुमारास तो व त्याच्या सोबतचे मिञ दत्ता शिंदे, सुमित असे कंपनीचे बाहेर चालत आले. कंपनितील सुनिता रमेश निळ यांची ड्युटी संपली आसल्याने त्या काही महीलांसोबत पुढे थोड्या अंतरावर पायी जात होत्या. रुबीकॉन कंपनीच्या गेटमधुन बाहेर आल्यानंतर सुनिता रमेश निळ व तिचे पती रमेश निळ यांचे आपसात भांडत सुरु होते. तेव्हा सुनिता निळ मदतीसाठी व स्वत:ला वाचवण्यासाठी धावत आल्या. त्यामुळे रमेश निळ यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता “तु कशाला आमचे भांडणात आला, तुला आमचे भांडणाचे काहीघेणे देणे नाही, “असे हणुन त्याच्या हातातील बाटलीतील अँसिड पहिल्यांदा सुनिताच्या दिशेने फेकले. म्हणुन साबळे हा रमेश निळ रा. जोगेश्वरी यांना पकडण्यासाठी गेला असता रमेश याने बाटलीतील अँसिड फेकले. ते अँसिड साबळेच्या दोन्ही डोळ्यांत व डोळ्याच्या आजुबाजुला, कपाळावर पडून जखमी झाला. याप्रकरणी प्रेम अप्पासाहेब साबळे, वय 18 वर्ष, रा. जोगवाई माता मंदिरजवळ, जोगेश्वरी, ता गंगापूर, जि छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कौतुकास्पद कामगिरी – पोलीस निरीक्षक अविनाश आघाव
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रेम साबळे या तरुणाने आपला जीव धोक्यात घालत भावाच्या नात्याने त्या महिलेचे प्राण वाचवले. सख्खा भाऊ सुद्धा आपल्या बहिणीसाठी एवढे करू शकत नाही. त्यामुळे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. एक दक्ष नागरिक म्हणून त्यांनी हे कर्तव्य केले. असे वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव म्हणाले.