March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.14) – बहिणीच्या लग्नासाठी उसने घेतलेले पैसे वेळेत परत न केल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाने वेटरच्या डोक्यात कुंडी मारून डोके फोडले. ही घटना रविवारी (ता.10) रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास बजाजनगरातील आम्रपाली बौद्ध विहार समोर घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर 11 मध्ये राहणारा दीपक पाटील (45) याच्या बजाजनगर येथील जय भवानी चौकातील हॉटेलमध्ये राहुल श्यामराम शेलकर (23) रा.शिवराणा चौक, बजाजनगर हा वेटर म्हणून कामाला होता. बहिणीचे लग्न असल्याने राहुलने हॉटेल मालक दीपक याच्याकडून 10 हजार रुपये हातउसने घेतले होते. दरम्यान, पैसे परत करण्यावरून दोघांमध्ये खटके उडत होते. त्यातच राहुल यास दीपकने कामावरून कमी केले. बहिणीच्या लग्नासाठी इतरही कर्ज काढल्याने पैसे देण्यास उशीर होत होता. रविवारी (ता.10) रोजी राहुल आम्रपाली बौद्ध विहाराच्या समोरील रसवंतीवर असताना, दीपक व राहुल यांच्यात पैसे परत करण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी संतापलेल्या पाटीलने बाजूला असलेली झाडाची कुंडी राहुलच्या डोक्यात मारली. यात राहुलचे डोके फुटून रक्त निघाले. त्यानंतरही दोन दिवसांच्या आत पैसे दिले नाहीत, तर तू पुन्हा मार खाशील, अशी धमकी देत पाटील निघून गेला. या प्रकरणी राहुल शेलकर याच्या तक्रारीवरून आरोपी हॉटेल मालक दीपक पाटील याच्या विरोधात मंगळवारी (ता.12) रोजी एमआयडीसी वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हवालदार राजेंद्र उदे करत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *