वाळूजमहानगर, ता.4 – बिल देण्याच्या कारणावरून धुडगूस घालत शिवीगाळ व मारहाण तसेच लोखंडी रॉडने हॉटेलच्या दरवाजा व फ्रिजच्या काचा फोडुन नुकसान केले. यात एक जण जखमी झाला. ही घटना वाळूज औद्योगिक वसाहतीतीत रविवारी (ता. 2) रोजी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, औद्योगिक वसाहतीतील एन आर बी चौकात असलेल्या हॉटेल कार्तिकी मध्ये सागर येवले व त्याचा मित्र महेश खांडेकर असे दोघे आले. तेथे त्यांनी ड्रिंक घेतली. जाते वेळी हॉटेलचे मँनेजर संजयकुमार नायक यांच्यासोबत बिल जास्त झाले. व सर्विस चांगली दिली नाही. या कारणावरुन वाद घालून शिवीगाळ करु लागले. त्यावेळी तेथे काम करणारा सुमन सत्यजित माहेती (वय 29), चिंतरंजन दास व वेटर शुभम गिरी हे भांडण सोडविण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी शिवीगाळ करत
लोखंडी रॉडने मारहाण करून सुमन माहिती याला जखमी केले. तसेच हॉटेलच्या दरवाजा व फ्रिजच्या काचा फोडुन नुकसान केले. याप्रकरणी सुमन सत्यजित माहेती त्याच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.