February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.4) – रस्त्यासाठी जागेचे कारण पुढे करून जर कोणी हिंदू महिलांवर अन्याय, अत्याचार करत असेल तर ते कदापिही सहन करणार नाही. वेळ प्रसंगी शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा सज्जड इशारा शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी बिल्डर दौलतखा पठाण यांचे नाव न घेता दिला.

वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील पंचगंगा हाऊसिंग सोसायटीत रस्त्याच्या कारणावरून बिल्डर दौलतखा पठाण व त्याच्या नातेवाईकांनी गांधी जयंती सोमवारी ता.2 ऑक्टोबर रोजी सोसायटीतील हिंदू महिलांना घरात घुसून मारहाण केली होती. या विषयी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी बुधवारी (ता.4) रोजी सायंकाळी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्रकारांशी बोलताना शिवसेना कधीही महिलांच्या संरक्षणासाठी उभी आहे. महिलांवर होणारे अन्याय कधीही सहन करणार नाही. आरोपींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. न झाल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ. असा सज्जड इशाराही यावेळी आमदार जैस्वाल यांनी दिला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *