March 23, 2026

रोटरी क्लब ऑफ जालना सेंट्रल व मॅजिक (मराठवाडा ऍक्सेलेरेटर फॉर ग्रोथ अँड इन्कुबाशन कौन्सिल), छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या आर आय एस ई (रोटरी इंनोव्हशन चालेंज फॉर सपोर्टींग इंट्रेप्रेनेरशिप) या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये हाय-टेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एमआयडीसी वाळूज, बाजजनगर येथील दोन संघांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रोत्साहनपर पुरस्कार पटकावले.

या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून 45 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी 12 उत्कृष्ट संघांची अंतिम सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती. या अंतिम फेरीत बजाजनगर येथील हाय-टेक इन्स्टिट्यूटच्या दोन्ही संघांनी आपली कल्पकता व सादरीकरणाच्या कौशल्यातून चमकदार कामगिरी करत परीक्षकांचे लक्ष वेधले.

विजयी संघात “एअरलांस” प्रकल्प सादर करणारा संघ द्वितीय वर्ष संगणक शाखेचा विद्यार्थी श्रीराम दवंगे यांच्या नेतृत्वाखाली होता. या प्रकल्पात हवाई तंत्रज्ञानातील स्मार्ट सोल्यूशनची संकल्पना मांडण्यात आली.
“अन्विक्षा ए आय” या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रथम वर्ष अभियंता विद्यार्थी पार्थ नाळे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विश्लेषण प्रणाली सादर केली.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरली असून, हाय-टेक इन्स्टिट्यूटमधील उदयोन्मुख नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळवून देणारी एक प्रेरणादायी संधी ठरली आहे.
या विद्यार्थ्यांचे भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथराव जाधव व संस्थेचे सहसचिव अमन जाधव यांनी स्वागत केले. तसेच याप्रसंगी हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. गोविंद एस. ढगे, आणि हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभागप्रमुख प्रा. अमोल एस. अडकिणे, सिव्हील विभागाचे प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रा. प्रताप एम. मोहिते, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. भावना पी. पिंगळे, सीएसईएआयएमएल विभागाचे प्रा. संदिप ई. इंगळे, ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंटस अधिकारी प्रा. जनार्धन के. भोर व महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव यांच्यासह प्राध्यापक, वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वागत करत सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशस्वी प्रकल्पांना महाविद्यालयातील उद्योजकता विकास विभागप्रमुख डॉ. शेख सोहेल आणि संशोधन व विकास समिती अध्यक्ष डॉ. सय्यद अख्तर हुसेन यांचे मार्गदर्शन लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *