वाळूज महानगर (ता.4) – भरधाव जाणाऱ्या एका हायवा ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील पती-पत्नीचा चिरडून जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात छत्रपती संभाजीनगर ते वैजापूर रोडवर देवगाव (रंगारी) जवळ शनिवारी (ता.4) रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास झाला.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील मनेगाव येथील राजेंद्र कुलकर्णी (55) आणि सीमा कुलकर्णी (50) हे पती-पत्नी दुचाकी (एम एच 15 डी क्यू – 5811) वरून छत्रपती संभाजी नगर ते वैजापूर रोडने जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या हायवा ट्रक (एम एच 17 बी वाय – 7218) जोराची धडक दिली. छत्रपती संभाजीनगर ते वैजापूर रोडवर देवगाव (रंगारी) जवळ शनिवारी (ता.4) रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरील कुलकर्णी पती-पत्नीचा चिरडून जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच देवगाव रंगारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
