March 26, 2026


वाळूजमहानगर, (ता.28) – भारतीय ग्रामीण पुर्नरचना संस्थेच्या हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा “आरंभ- 2023″ चा मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम 25 मे रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेथे सचिव एकनाथ जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर (मसिआ) चे अध्यक्ष अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते नटराज यांच्या प्रतिमेची व सरस्वती देवीची पुजा करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वत:चे धेय ठेवून विविध क्षेत्रात प्रगती करावी. फक्त नौकरी न करता नौकरी निमार्ण करणारा एक चांगला उद्योजक व्हावे, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करून मोठे सनदी अधिकारी व्हावे. असे त्यांनी सांगितले. तसेच प्रमुख पाहुणे अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी सर्वागिन विकासासाठी शिक्षणाबरोबरच कला व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्राविण्य मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यातील गुणाबरोबरच विद्यांतील सकृत कलागुणांवरही भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांची जडणघडण
होताना त्यामध्ये संवाद कौशल्य, चर्चासत्र, नेतृत्वगुण आदी गुणाचे महत्व विशद केले. विद्यार्थ्यांनी चांगला अभियंता होवून स्वतः एक यशस्वी उद्योजक बनावे. असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करत आपल्यातील सुप्त गुणांना जागरूक ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गोविंद एस ढगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून संस्थेचा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा व इतर बाबतीचा आजपर्यतच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

या “आरंभ- 2023” चा प्रारंभ 15 मे रोजी विविध क्रिडा स्पर्धांनी करण्यात आला. 15 ते 22 मे पर्यंत महाविद्यालयात विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल होती. यामध्ये प्रामुख्याने क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, बुध्दिबळ, कॅरम, रस्सिखेच, खो-खो आदी खेळ व ट्रेडिशनल डे, ग्रुप- डे, रोझ डे, साडी डे. अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्नेह संमेलनाच्या मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमदिनी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गणराज वंदना नाट्य, गीत, गायन, कविता वाचन, गाणे, नृत्य, लावणी असे विविध कलाचे सादरीकरण करत उपस्थिांची मने जिंकली. त्यामध्ये तरुणाईचा उत्साह देखण्या जोगा होता. आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विदयार्थी आणि पालक यांचा उत्सफूर्त प्रतिसाद यावेळी लाभला होता.

याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात येवून त्यांच्या कलाचे कौतुक करण्यात आले. या प्रसंगी भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सहसचिव अमन जाधव तसेच हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. गोविंद ढगे, हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभागाचे प्रमुख प्रा. अमोल अडकिणे, सिव्हील विभागचे प्रा.आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रमुख प्रा. प्रताप मोहिते, प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख डॉ.भावना पिंगळे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी प्रा. जनार्धन भोर, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा. आशुतोष यताळकर, मयुरी हिवाळे, संगम गुंडगोळे, सुयश यादव यांनी प्ररिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. स्मिता खाजेकर व ऋषीकेश गवाले यांनी केले तर आभार प्रा.प्रताप माहिते यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *