March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.15) – बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.टेक प्रथम वर्षाच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी 15 दिवसाच्या इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडा कार्यक्रम, स्वागत समारंभ, पालक मेळावा तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम विषयक, विद्यापीठ विषयी, सामाजिक कार्याची व संपुर्ण महाविद्यालयातील विविध विभागाची माहिती आणि इंडस्ट्रियल व्हिजिट आदी कार्यक्रमांचा समावेश होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर-रायगड यांच्या अभ्यासक्रमातंर्गत असलेल्या इंडक्शन प्रोग्राम मध्ये विविध प्रकारचे चर्चासत्रे घेण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणामध्ये असलेल्या संधी तसेच स्पर्धेच्या युगामध्ये करावयाची तयारी याबदद्लचे मार्गदर्शन तसेच उद्योजक आणि उद्योजकता विकास संदर्भात कार्यशाळा, मानिसक आणि शारीरिक बळकटी बनवण्यासाठी सायकॉलॉजिकल ट्रेनिंग प्रोग्राम घेण्यात आले. या कार्यकमाचे वैशिष्टे म्हणजेच विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व वाहतुक नियमा बाबतची माहिती, कायदेविषयक माहिती सायबर सेक्युरेटी या विषयी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, शिस्त आणि समय सूचकता या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे सहसचिव अमन जाधव यांनी तंत्रज्ञान आणि त्याविषयीची असणारी विद्यार्थ्यांची जिज्ञासा ही जगाच्या पाठीवर भारताला सरस ठेवण्यासाठी मदत करेल आणि विद्यार्थ्यांनी आपल्यातील अंर्तगुणाला वाव दिला पाहिजे. असे सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रंसगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय आणि महाविद्यालयात असलेल्या शिवस्मारक परिसरात विविध वृक्षांचे वृक्षारोपण करून शिवस्मारक तसेच महाविद्यालयाच्या
परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी प्राचार्य प्रा. गोविंद ढगे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सोयीसुविधा, विविध शाखेतील महत्व व त्यातील संधी याबाबतचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्याना तसेच पालकांना संस्थेविषयीची माहिती आणि महाविद्यालयातील आजपर्यंत प्रगती आढावा सादर केआला. याप्रसंगी हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभाग प्रमुख प्रा. अमोल अडकिणे, सिव्हील विभाग प्रमुख प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. प्रताप मोहिते, प्रथम वर्षीचे विभागप्रमुख प्रा. भावना पी. पिंगळे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी प्रा. जनार्धन भोर व महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्याचे स्वागत केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *