March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.7) – भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचा व पर्यावरणाचा विचार करत एक भव्य रक्तदान शिबीर व वृक्ष लागवड आयोजित करण्यात येत आहे. हा उपक्रम आज सोमवारी 7 जुलै रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 3 या वेळेत बजाजनगर येथील हाय-टेक कॉलेज कैम्पसच्या श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी हॉल येथे होत आहे.

या रक्तदान शिबिराचे व वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सहसचिव अमन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेच्या विविध शैक्षणिक संस्थांचा -हाय-टेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, हायटेक कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्पुटर सायन्स, श्रीनाथ कॉलेज ऑफ आर्टस्, कॉर्मस, अँड सायन्स, श्रीनाथ इंस्टिट्युट ऑफ नर्सिंग, अग्रगण्य पब्लिक स्कुल (CBSE), राजा शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजा शिवाजी प्रायमरी स्कुल, अँडव्हान्स करिअर सेंटर यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. या शिबिरात दत्ताजी भाले रक्तकेंद्र, डॉ. हेडगेवार रुग्णालय, छ. संभाजीनगर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर राबवण्यात येत आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना विनंती करण्यात आली आहे. रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू देऊन गौरवण्यात येईल.
या उपक्रमात संस्थेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग घेणार असून, शिक्षण सम्राट एकनाथ जाधव यांच्या समाजसेवेच्या कार्याला मानवंदना देण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम ठरणार आहे.
या समाजोपयोगी उपक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *