March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.9) – बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर व भारतीय गामीण पुर्नरचना संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘, मतदान वाढवा’ या अभियानाचा कार्यकम सोमवारी (ता.8) रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव तसेच सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अर्चना खेतमाळीस, उपजिल्हाधिकारी रामदास दौड, प्रभोदय मुळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी रूपा चित्रक, स्वीप नोडल अधिकारी दिपाली चावरे, गायिका श्रावणी महाजन आदी कार्यक्रमास उपस्थित होते. प्रथम सरस्वती देवीची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एकनाथ जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मतदानाविषयी, मतदान अभियानाविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मराठी नववर्षाचा संकल्प मतदान वाढविण्याचा आहे. यानिमित्त गुढीपाडवा मतदान वाढवा या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली असुन सर्व पात्र मतदारांनी येणा-या लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी निवडणुकीमध्ये मतदानांचा टक्का वाढविण्याबाबत जनजागृती करून नवमतदार विद्यार्थ्यांना, शिक्षक व पालकांना मार्गदर्शन केले. मतदान करणे हा आपला हक्क असुन त्याबाबतचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. तसेच उपजिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रॅली काढून विविध पथनाट्य, भारुड, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

या प्रसंगी भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सहसचिव अमन जाधव, हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. गोविंद ढगे, श्रीनाथ कॉलेज ऑफ फॉमसीचे प्राचार्य डॉ. संतोष शेळके, राजाशिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विमल आधव, औरंगाबाद पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका डॉ. चंद्रकला शर्मा, हायटेक कॉलेज ऑफ मैनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्सचे प्राचार्य प्रा.व्ही. आर. शिराळे, राजाशिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचेचे प्राचार्य डॉ. एस. एस. कादरी, ॲडव्हान्स करिअर सेंटरचे प्रा. बिंदू भूषणकुमार, हायटेक अभियांत्रिकीचे प्रा. अमोल अडकिणे, प्रा. आर एफ. सिध्दीकी, प्रा. प्रताप मोहिते, डॉ. भावना पिंगळे, प्रा. संदीप इंगळे, प्रा. अनार्धन भौर, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांची उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीप टीमचे मनोज बोरुडे, गोविंद उगले, साहेबराव धनराज आणि महाविद्यालयाचे प्रा. प्रताप मोहीते आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. कैलास अतकरे यांनी तर आभार प्राचार्य प्रा. गोविंद एस.ढगे यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *