वाळूजमहानगर, ता.12 – बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविदयालयातून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग शाखेतून उत्तीर्ण झालेली पुनम श्रीहरी कदम हिची कॅपजेमीनी या बहुराष्ट्रीय कंपनीत सिस्टीम अनॅलिस्ट म्हणून निवड झाली आहे.
तिच्या या यशाबददल भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथराव जाधव व संस्थेचे सहसचिव अमन जाधव यांनी तीचे स्वागत केले. यावेळी हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. गोविंद एस. ढगे, आणि हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अमोल एस. अडकिणे, सिव्हील विभागचे विभाग प्रमुख प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा. प्रताप एम. मोहिते, प्रथम वर्षीचे विभागप्रमुख डॉ. भावना पी. पिंगळे, ट्रेनिग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी प्रा. जनार्धन भोर, सीएसईएआयएमएल विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदिप इंगळे व महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.