वाळूज महानगर, (ता.16)- भारतीय ग्रामीण पुर्नरचना संस्था संचलित हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा “आरंभ-2024” चा मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम संत एकनाथ रंगमंदिर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय ग्रामीण पुर्नरचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकलचर (मसिया) चे अध्यक्ष चेतन राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नटराजाच्या मुर्तीची, सरस्वती देवीची पुजा व गणेश वदंना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यांनंतर प्राचार्य प्रा. गोविंद ढगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून संस्थेचा विकास आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, व क्रीडा व इतर बाबतीच्या आजपर्यतच्या प्रगतीचा आढावा सादर केला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकलचर (मसिया) चे अध्यक्ष चेतन राऊत यांनी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी सर्वांगिन विकासासाठी शिक्षणाबरोबरच कला व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्राविण्य मिळवणे आवश्यक आहे. विदयार्थ्यांतील गुणाबरोबरच सुप्त कला गुणांवरही भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांची जडणघडण होताना त्यामध्ये संवाद कौशल्य, चर्चासत्र, नेतृत्वगुण हे महत्व विशद केले. विदयार्थ्यांनी चांगला अभियंता होवून स्वतः एक यशस्वी उद्योजक बनावे असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विवद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करत
आपल्यातील सुप्त गुणांना असेच जागरूक ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
या “आरंभ 2024” चा प्रारंभ विविध क्रिडा स्पर्धानी करण्यात आला होता. महाविद्यालयात विविध खेळ, सांस्कृतिक कार्यकमाची रेलचेल होती. यामध्ये प्रामुख्याने क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, बुध्दिबळ, कॅरम, रसिखेच, कबडडी हे खेळ आणि बॉलीवुड डे, ट्रेडिशनल डे, ग्रुप डे, मिसमॅच डे. असे डे सिलेब्रेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गणराज वंदना, नाटय, गीत, गायन, कविता वाचन, डान्स, गाणे, नृत्य, लावणी असे विविध कलाचे सादरीकरण करत उपस्थिांची मने जिंकली. त्यामध्ये तरूणाईची उत्साह देखण्या जागा होता आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विदयार्थी आणि पालक यांचा उत्सर्जूत प्रतिसाद यावेळी लाभला होता.
याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विदयार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात येवून त्यांच्या कलाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी भारतीय ग्रामीण पुर्नरचना संस्थेचे सहसचिव अमन जाधव, तसेच हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. गोविंद ढगे, हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभागाचे प्रमुख प्रा. अमोल अडकिणे, सिव्हील विभागचे प्रमुख प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रमुख प्रा. प्रताप मोहिते, सीएसई एआयएमएलचे प्रमुख प्रा. संदीप इंगळे, प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख डॉ. कांचन पट्टेबहादुर, ट्रेनिग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी प्रा. जनार्धन भोर, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांची उपस्थित होती.
“आरंभ-2024″साठी कल्चरल इनचार्ज प्रा. आशुतोष येताळकर, जनरल सेक्रटरी संगम गुंडगोळे, कल्चरल सेक्रटरी प्रणित वणे तर स्पोर्टस सेक्रटरी सुयश यादव यांनी अधिक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. कैलास अतकरे व प्रा. स्मिता खाजेकर यांनी केले तर आभार डॉ. कांचन पट्टेबहादुर यांनी मानले.
————-