March 27, 2026


वाळूजमहानगर, (ता.22) – भारतीय ग्रामीण पुर्नरचना संस्था संचलित हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, शिवआरती व शिवगर्जना करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात “छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती सोहळा 2023 जय जिजाऊ जय शिवरायच्या जयघोषात साजरी करण्यात आली.

या वेळी विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा, शिव पोस्टर
प्रदेशन, राज्यगीताचे वाचन, शिवव्याख्यान आणि कवितेचे वाचन तसेच विविध कलाचे सादरीकरण करण्यात आले. संस्थेचे एकनाथ जाधव व सहसचिव अमन जाधव यांच्या मागदर्शनाखाली या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. याप्रसंगी एकनाथ जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणावे. असे आवाहन केले. प्राचार्य प्रा.गोविद ढगे यांनी आधुनिक शिवाजी महाराज यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाच्या हितासाठी प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी विशिष्ट स्थान निर्माण करावे, तसेच विद्यार्थ्यांनी आपल्यातील आत्मविश्वास जिद्द चिकाटी, वेगवेगळया परिस्थितीत सामोरे जाण्याची तयारीबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते बाळासाहेब काळे उपस्थित होते. त्यांनी भाषणातून आजचा विद्यार्थी आणि छत्रपतीचे विचार या विषयी मार्गदर्शन केले. जिजाऊ मातेचे संस्कार आणि शहाजी राजांचे संघर्ष यातुन छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या कार्याचे प्रबोधनपर मार्गदर्शन त्यांनी केले.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनचे समन्वयक प्रा. के.पी. जावळे, प्रा. आशितोष येताळकर व प्रा. ऋषीकेश आहेर यांच्या मागदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ केला व बजाजनगर मधील शिवस्मारक परीसरातील साफसफाई
करुन शिवस्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रा. अमोल अडविणे, प्रा. एफ. एफ. सिध्दीकी, प्रा. प्रताप मोहिते, प्रा. चक्रधर जाधव, प्रा. जनार्धन भोर, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पल्लवी भगत, ऋषीकेश गवाले यांनी केले, तर आभार प्रा. स्मिता खाजेकर यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *