वाळूजमहानगर – बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वैभव सोनकांबळे, अंजली शेळगे, कल्याणी सोमवंशी व राहुल आहेर या चार विद्यार्थ्यांची नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर सायन्स शाखेतून उत्तीर्ण झालेला वैभव सोनकांबळे याची लाईट अँण्ड वंडर या बहुराष्ट्रीय कंपनीत असोशिएट सॉफटवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. तसेच अंजली राम शेळगे हिची हेक्सावेअर टेक्नोलॉजीज, कल्याणी विलास सोमवंशी हिची कॅपजेमीनी या बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये सॉफटवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. तसेच मेकॅनिकल इंजिनिअर शाखेतून उत्तीर्ण झालेला राहूल आहेर याची क्युस कॉर्पोरेशन लि. या कंपनीमध्ये टेस्टींग इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. विद्यार्थ्याच्या या यशाबददल भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथराव जाधव व संस्थेचे सहसचिव अमन जाधव यांनी त्याचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. गोविंद एस. ढगे, हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभागविभाग प्रमुख प्रा. अमोल एस. अडकिणे, सिव्हील विभाग विभाग प्रमुख प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभागविभाग प्रमुख प्रा. प्रताप एम. मोहिते, प्रथम वर्षोचे विभागप्रमुख डॉ. भावना पी. पिंगळे, ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी प्रा. जनार्थन के. भोर व महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वैभव सोनकांबळे, अंजली शेळगे, कल्याणी सोमवंशी, राहूल आहेर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.