March 23, 2026


वाळूजमहानगर (ता.08) – भारतीय ग्रामीण पुर्नरचना संस्था संचलित हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालय व श्रीनाथ कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालय आणि हायटेक कॉलेज ऑफ मैनेजमेंट अॅण्ड कॉम्प्युटर सायन्स महाविदयालय यांच्या संयोगाने 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय ई-कॉन्फरन्स ‘बेसिक अॅण्ड इंजिनिअरिंग सायन्स इंटरडिस्पिलीनरी परस्पेस्टीव्ह” या विषयावर आयोजित करण्यात आली होती.

इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या वतीने ही कॉन्फरन्स घेण्यात आली. या ई-कॉन्फरन्सचे उदघाटन शनिवारी (ता.28) रोजी भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव व सहसचिव अमन जाधव यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. या प्रसंगी एकनाथ जाधव व अमन जाधव यांनी ई-कॉन्फरन्स बाबत मार्गदर्शन केले.
या कॉन्फरन्सला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे यांनी शुभेच्छा संदेश दिला. यावेळी प्राचार्य गोविंद एस. ढगे यांनी कॉन्फरन्सची रूपरेषा आणि विविध विषयांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्व पटवुन दिले. त्याचबरोबर विदयार्थ्यांना स्पर्धेच्या युगात स्वतला सिद्ध करण्याकरिता अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठाचे परिषद सदस्य व श्रीनाथ कॉलेज ऑफ फॉमसीचे प्राचार्य डॉ. संतोष शेळके यांनी अशा कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी, प्राध्यापकासाठी किती उपयुक्त आहे. या संदर्भात मार्गदर्शन केले. या तीन दिवसीय ई कॉन्फरन्सला विविध विषयाचे तंत्र आणि तंत्रज्ञान, नवप्रवर्तन या प्रकारच्या विविध क्षेत्रातील बीजभाषक व अभिवाचक यांनी विस्तृत व विविध चर्चासत्र घेण्यात आले. विविध मान्यवरांनी संशोधन व नाविण्यता या सोबत मुलभुततेतून सध्यस्थिती विज्ञान व तंत्रज्ञान आधुनिक प्रवाह व आव्हाने व त्यातील उदयोन्मुख कल या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या ई-कॉन्फरन्ससाठी विविध देशातील नामांकित विदयापीठ व महाविदयालयातील 135 पेक्षा जास्त प्राध्यपकांचे व संशोधकांचे पेपरचे सादरीकरण करण्यात आले होते.
या प्रसंगी हायटेक अभियांत्रिकीचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव, मैकेनिकल विभाग प्रमुख प्रा. अमोल एस. अडकिणे, सिव्हील विभागचे प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रा. प्रताप एम. मोहिते, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. भावना पिंगळे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रा. जनार्धन मोर यांनी सहभाग घेतला. या ई-कॉन्फरन्ससाठी श्रीनाथ कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालयाचे डॉ. किशोर कदम, हायटेक कॉलेज ऑफ मैनेजमेंट अॅण्ड कॉम्प्युटर सायन्स महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विजय शिराळे, हायटेक अभियांत्रिकीचे प्रा. जगन्नाथ गोडसे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. कैलास अतकरे व प्रा. स्मिता खाजेकर यांनी केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *