
वाळूज महानगर, (ता. 6) – बजाजनगर स्थित हायटेक अभियांत्रिकी महाविदयालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतून उत्तीर्ण झालेला रितेश गणेश पवार याची ‘गरवारे हाय-टेक फिल्मस’ या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत प्रोडक्शन इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. तसेच कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजि. शाखेतून उत्तीर्ण झालेला शेख साऊद अब्दूल साबूर याची ‘थॉमस कुक (इंडिया) प्रा. लि.’ या बहुराष्ट्रीय कंपनीत ट्रेनी इंजिनिअर म्हणून निवड झालेली आहे.

या विद्यार्थ्यांच्या यशाबददल भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथराव जाधव व संस्थेचे सहसचिव अमन जाधव यांनी त्याचे स्वागत केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. गोविंद एस. ढगे, आणि हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभाग प्रमुख प्रा. अमोल एस. अडकिणे, सिव्हील विभागचे प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रा. प्रताप एम. मोहिते, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. भावना पी. पिंगळे, सीएसईएआयएमएल विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदिप ई. इंगळे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी प्रा. जनार्धन के. भोर व महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी.वी. जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती
