
वाळूजमहानगर (ता.25) – गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूज तर्फे ग्रामीण भागातील महिलांसाठी तीन दिवासीय हळदीकुंकू महोत्सव 18 ते 20 जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन महिला विभागाच्या प्रमुख वर्षा ढेपे आणि आशा गोरडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक शीर सुनील सुतवने उपस्थित होती.

पहिल्या दिवशी महिलांसाठी विविध खेळ आणि गमती जमती चा क्रयाक्र्म आयोजीत करण्यात आला होता यात विविध खेळांच्या स्पर्धेच्या घेण्यात आल्या महिलांनीही या स्पर्धेचा खूप सारा आनंद लुटला. दुसऱ्या दिवशी महिला स्वा संरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आला या कार्यशाळेत विशेषतः मंगळसूत्र हिसकवणे तसेच बेसावध असाल त्यावेलस कुणी आपल्यावर हल्ला केला तर त्याला कसा प्रतिकार करून स्व संरक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले हे प्रशिक्षण श्री रामेश्वर चायल आणि अश्विनी चायल यांनी दिले. २० तारीख ला शेवट च्या दिवशी महिलांसाठी सायबर क्राइम च्य वतीने आपण मोबाईल वापरताना कोणती कालजी घ्यावि कोणते अप्लिकेशन वापर करताना कोणती काळजी घ्यावी तसेच कुठल्याही भूलतपाच्या आणि लोभाच्या मोहात न पडता आपण सतर्क राहावे. या साठी अमोल सातोदकर
सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर क्राइम यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच यांच्या शुभहस्ते विविध पारितोषिके सुधा देण्यात आली. याप्रसगी हाप्पी चाइल्ड स्कुल च्या मुक्याध्यापिका चौधरी madam प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या प्रसंगी एकूण ५०० महिला उपस्थित होत्या.सर्व महिलांना कार्यक्रमाच्या प्रसंगी भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम चे सुत्रसंचालन आणि आभार वाळूज गरवारे कम्युनिटी सेंटर चे केंद्रप्रमुख श्री मिथीन चव्हाण यांनी केले याश्वितेसाठी अर्चना साळवे ,रेखा भंडारे , नेहा गुप्ता ,नेहा वायकोस , पूनम जेसवाल , प्रवीण कुलकर्णी , रामेश्वर वले आदींनी परिश्रम घेतले.
