वाळुज महानगर, (ता.1) विक्री करण्यास बंदी असलेल्या सरकारी तांदूळ, डाळ असे धान्य पॉलिश करून त्याची विक्री करत हफाफाचा माल गफाफा करणाऱ्या एका कंपनीवर पोलिसांनी छापा मारून 20 जणांना ताब्यात घेतले. करोडी शिवारात शनिवारी (ता. 1) रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत हजारो क्विंटल धान्य जप्त करण्यात आले असून त्याची किंमत करोडों रुपयांत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,
करोडी शिवार गट क्र. 111 मधील श्री गजानन अॅग्रो कंपनीत शासनाचे धान्य पॉलिश करून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपायुक्त नितिन बगाटे, सहायक पोलीस उपायुक्त सचिन सानप, दौलताबाद ठाण्याच्या निरीक्षक रेखा लोंढेसह पथकाने शनिवारी (ता. 1) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास छापा माराला.
यावेळी येथील चार गोडावूनची पाहणी केली असता तेथे महिला बाल कल्याण विभागाचे लेबल लावलेले महिला व स्तनदा माता व किशोर वयीन मुलींकरताचे पोषण आहराच्या गोण्या आढळून आल्या.
त्यात महाराष्ट्र व पंजाब शासनाचे लेबल असलेल्या तांदळाचा समावेश आहे. याबाबत मॅनेजर नितीन काजी यास मालकाबाबत विचारपूस केली असता संजय अग्रवाल यांची कंपनी असल्याचे सांगितले. मंगेश जाधव यांच्या मालकीचे गोडावून असून ते किरायाने घेऊन तेथे कंपनी सुरू केली. ही कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याने किती नेमका मुद्देमाल जप्त केला.
यांची माहिती मिळाली नाही. याप्रकरणी गोडावून मालक मंगेश जाधव व त्याचे दोन मित्र तसेच कंपनी मॅनेजर नितीन काजी तसेच 20 कामगारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
यांनी केली कारकाई
रात्री उशिरापर्यंत सुरु असलेली ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितिन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त सचिन सानप, संपत शिंदे, सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, रेखा लोंढे, संग्राम ताठे, निर्मला परदेशी, प्रवीणा यादव, गजानन कल्याणकरसह 50 ते 60 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी केली. दरम्यान महसूल विभागाचे निवासी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, बीओसो प्रवीण फुलारे यांच्यासह शालेय पोषण आहाराचे अधिकरी व तहसीलदार यांनाही पाचरण करण्यात आले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.