वाळूजमहानगर, ता.2 – बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवानी माध्यमिक विद्यामंदिरात आठवी ते दहावी च्या विद्यार्थिनींना मासिक पाळी, स्वच्छता प्रशिक्षण कार्यक्रम मंगळवारी घेण्यात आला. यावेळी प्रत्येकीला चार पॅकेट प्रमाणे 585 मुलींनी मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.
एका एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत “उजास” या प्रकल्पाद्वारे स्व. भैरोमल तनवानी माध्यमिक विद्यामंदिरात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी समन्वयक रेखा दाभाडे यांनी शालेय विद्यार्थिनींना मासिक पाळीत कोणकोणती काळजी घ्यावी तसेच स्वच्छता व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. उद्योजक हनुमान भोंडवे, अशोक लगड, विजय उखळे, पंडीत नवले, राजेंद्र माने, मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी शाळेतील सर्व सहशिक्षिका व विद्यार्थिनीची उपस्थिती होती.