वाळूजमहानगर, (ता.29) – दहावी बोर्डाच्या परीक्षेतील उत्कृष्ट निकालाची परंपरा बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवानी विद्यालयाने याही वर्षी कायम राखत प्राची भारत भराड हिने 98.80 गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला. तर किरण आजिनाथ धायतडक 98.00 गुण मिळवून द्वितीय आणि किरण राजू कांदे व साक्षी रामेश्वर काळे यांनी 97.40 गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
शाळेतील एकूण 400 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी 42 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले असून 210 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार किशनचंद तनवानी, पदाधिकारी हनुमान भोंडवे, अशोक लगड, विजय उखळे, राजेंद्र माने, पंडीत नवले, मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, पर्यवेक्षक अशोक मुटकुळे यांनी स्वागत केले. या विद्यार्थ्यांना समन्व्यक रोहन आंबेकर, केशव कानिटकर, सुभाष पाटील, प्रदीप माळी, शारदा पगारे, नाविद शेख, मेघा इटणकर, शोभना गव्हाड, दत्तात्रय पवार, रूपाली पवार, दीपाली तुसे, दीपाली ठाकरे, शाम गलांडे, गणेश अवसरमल यांचं मार्गदर्शन लाभलं.