February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.29) – स्व. भैरोमल तनवानी विद्यालयात प्रजासत्ताक दिना निमित्त ए. सि. इ. वाय. कंपनीचे स्वप्निल चोगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक कवायतीचे सादरीकरण करून प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

सर्वप्रथम प्रभातफेरीकाढण्यात आली. या फेरीत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व पर्यावरण विषयक घोषणा दिल्या. या नंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे स्वप्निल चोगले यांनी विद्यार्थ्यांना आपल्या हृदयात देशप्रेम, स्वाभिमान, आई -वडील, गुरू यांच्या बद्दल आदर असलाच पाहिजे. असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे इलडोस पौळ, ऍडव्होकेट संदीप राजेभोसले, संस्थेचे सचिव अशोक लगड, गणेश भोंडवे, स्वप्निल नवले, स्वप्निल उखळे, पालक प्रतिनिधी निवृत्त मेजर लक्ष्मण गिरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत, झांज प्रात्यक्षिक, शारीरिक कसरतींचे, जुदो,लाठी -काठी चे प्रात्यक्षिक, मनोरे, देशभक्तीपर गीते तसेच बालवर्गाचे समूह नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थ्यांनी कवायती द्वारे भारताचा नकाशा, स्वस्तिक, इंग्लिश मध्ये इंडियन आदी प्रात्यक्षिक सादर केली. पालकांनी यावेळी प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *